सार्वजनिक सेवा सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी, आम्ही विविध ना हरकत प्रमाणपत्रांसाठी (NOC) अर्ज करण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करत आहोत. नागरिक आता पेड बंदोबस्त, भाडेकरू तपासणी / लीज व परवाना करार यांसारख्या परवानग्यांसाठी सहजपणे अर्ज सादर करू शकतात. प्रत्येक फॉर्ममध्ये अर्जदाराची व कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली जाते, आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा दिली आहे, तसेच आवश्यक घोषणाही समाविष्ट आहेत. हे उपक्रम पोलिसांच्या नियमांचे पालन करताना मंजुरी प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम बनवतो..